श्रीशंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा - Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभाजी महाराज

'श्रीशंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा' 

Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभाजी महाराज 

१६ जानेवारी हा दिवस अखंड महाराष्ट्रात छ्त्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन म्हणून जल्लोषात साजरा केला जातो.  छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची जी मुहुर्तमेढ रोवली त्याच हिंदवी स्वराज्याची घोडदौड अविरतपणे अखेरच्या श्वासापर्यंत पुढे चालू ठेवणारा हा युवराज याच दिवशी स्वराज्याचा दुसरा छत्रपती झाला. या दिनानिमित्त घेतलेला हा थोडक्यात आढावा.

Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभाजी महाराज 

विश्वा म्हणे..!

विश्वजीत राळे पा.



Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभाजी महाराज
श्रीशंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा


श्रीशंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा


    १६ जानेवारी १६८१..'श्रीशंभूछत्रपती राज्याभिषेक' हा केवळ एक जल्लोषाचा सोहळा नव्हता तर तो एक शपथविधी होता रयतेला दिलेला शब्द पाळण्यासाठीचा..शिवछत्रपतींच्या जाण्याने पोरक्या झालेल्या प्रजेवर पुन्हा एकदा मायेचं पांघरूण घालण्यासाठीचा..!
ज्याचे स्वप्न खुद्द शहाजीराजेंनी पाहिले होते, जे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जिजाऊंनी केलेला त्याग अन शिवरायांनी केलेली जी खडतर तपश्चर्या होती, आज त्याच स्वप्नावर म्हणजे हिंदवी स्वराज्यावर चहूबाजूंनी जे काळे मेघ दाटले होते त्यांना या स्वराज्यपटलाहून लुप्त करण्यासाठी झालेला एक सूर्योदय होता तो..!
न झुकता, न डगमगता अखंडपणे पराक्रमाची शर्थ करताना अखेरच्या श्वासापर्यंत अन प्राणपणाने लढताना रक्ताच्या थेंबाथेंबातून उठलेल्या हुंकारापर्यंत, शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने 'छत्रपती' पदाचा काटेरी मुकूट मस्तकी धारण करून स्वराज्यमंदिर उभे करण्यासाठी अन तेच हिंदवी स्वराज्यमंदिर नष्ट करण्याच्या हेतूने ५ लाखांचा सेनासागर सोबत घेऊन निघालेल्या औरंग्याला इथे याच मातीत कायमचा शांत करून स्वराज्य अबाधित राखण्यासाठी नियतीशी केलेला एक करार होता तो..!   

🖋

- विश्वजीत राळे पा.


'श्रीशंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा'

'Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभाजी महाराज' 

विश्वा म्हणे..!

विश्वजीत राळे पा.

Post a Comment

0 Comments